बॉलन-डी'ओरवरील रोनाल्डो-मेस्सीची मक्तेदारी संपुष्टात

वृत्तसंस्था
Tuesday, 4 December 2018

पॅरिस : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची दशकभराची मक्तेदारी संपुष्टात आणत क्रोएशियाच्या लुका मॉड्रिचने फुटबॉल विश्‍वातील सर्वांत प्रतिष्ठेचा बॅलन डी'ऑर हा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत क्रोएशियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले; परंतु मॉड्रिचने आपल्या खेळाचा ठसा उमटवला होता. 

पॅरिस येथे झालेल्या 'फिफा'च्या या पुरस्कार सोहळ्यात 33 वर्षीय मॉड्रिचच्या नावाची घोषणा झाली आणि त्याच वेळी मेस्सी- रोनाल्डो यांचे गेल्या दहा वर्षांतले साम्राज्य खालसा झाले; परंतु रोनाल्डो या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. फ्रान्सचा स्ट्रायकर अँथोनी ग्रीझमन तिसरा आला. विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वोत्तम युवक खेळाडू ठरलेला कायलेन एम्बापे चौथा; तर मेस्सी पाचवा आला. सर्वोत्तम तरुण खेळाडू पुरस्कारासाठी असलेली कोपा ट्रॉफी एम्बापेनेच जिंकली. 

''फुटबॉल खेळणाऱ्या प्रत्येक लहान मुलासाठी बॅलन डी'ऑर हे लक्ष्य असते. मोठ्या नामवंत क्‍लबमधून खेळणे आणि जास्तीत जास्त विजेतेपद मिळवणे हे माझे लक्ष्य होते,'' असे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकल्यानंतर मॉड्रिच म्हणाला. फ्रान्स फुटबॉल मासिकाच्या या बॅलन डी'ऑर पुरस्कारासाठी 30 खेळाडू पात्र ठरले होते. जगभरातील 180 फुटबॉल पत्रकारांनी हे सर्वोत्तम खेळाडू निवडले. 

बॅलन डी'ऑर हे माझ्यापेक्षा स्वप्नाच्या पलीकडचे आहे. हा प्रतिष्ठेचा करंडक उंचावणे हे माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे आहे. 
- लुका मॉड्रिच 

मॉड्रिचची यशोमालिका 
हा पुरस्कार जिंकणारा मॉड्रिच आत्तापर्यंतच्या इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये वयस्कर ठरला. 2006 मध्ये इटलीच्या फॅबिओ कॅनावारो यांनीही हा पुरस्कार मिळवला, त्या वेळी त्यांचेही वय 33 वर्षे होते. मॉड्रिच विश्‍वकरंडक स्पर्धेतही गोल्डन बॉल पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्याअगोदर मोसमातील यूएफा आणि फिफाचा सर्वोत्तम खेळाडूचाही पुरस्कार त्याने मिळवला होता. मॉड्रिच 2012 पासून रेयाल माद्रिद क्‍लबकडून खेळत आहे. गतवर्षी या संघाने चॅम्पियन्स करंडक जिंकलेला आहे. या क्‍लबमध्ये दाखल झाल्यापासून मॉड्रिचने 14 करंडक जिंकलेले आहेत

संबंधित बातम्या