बरोबरीमुळे लिव्हरपूलने अव्वल स्थान गमावले 

वृत्तसंस्था
Monday, 4 March 2019

मोहंमद सालाह तसेच मायकेल कीन यांनी दवडलेल्या गोलच्या संधीमुळे लिव्हरपूल विजयापासून वंचित राहिले. आता एव्हर्टनचा लिव्हरपूलविरुद्धचा 10 वर्षे सुरू असलेला विजयाचा दुष्काळ कायम राहिला असला, तरी लिव्हरपूलची विजेतेपदाची प्रतीक्षा 29 वर्षांपेक्षा जास्त लांबेल, याची खबरदारी त्यांनी नक्कीच घेतली.

लंडन : गोलच्या दोन सोप्या संधी दवडल्याचा फटका लिव्हरपूलला बसला आणि त्यांना प्रीमियर लीगमध्ये साऊदम्प्टनविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली. या बरोबरीमुळे लिव्हरपूलने अग्रस्थान गमावले. मॅंचेस्टर सिटीने यामुळे आठवड्याअखेरीस अग्रस्थान राखले. 

मोहंमद सालाह तसेच मायकेल कीन यांनी दवडलेल्या गोलच्या संधीमुळे लिव्हरपूल विजयापासून वंचित राहिले. आता एव्हर्टनचा लिव्हरपूलविरुद्धचा 10 वर्षे सुरू असलेला विजयाचा दुष्काळ कायम राहिला असला, तरी लिव्हरपूलची विजेतेपदाची प्रतीक्षा 29 वर्षांपेक्षा जास्त लांबेल, याची खबरदारी त्यांनी नक्कीच घेतली. चॅंपियन्स लीगमधील अपयश धुवून काढण्यासाठी प्रयत्नशील असलेला गोलरक्षक केपा ऍरिझॅबाल्गा याच्या समाधानकारक कामगिरीमुळे चेल्सीने फुलहॅमला 2-1 असे नमवले. सुरवातीच्या टप्प्यात चेल्सीने आघाडी गमावल्यावर केपाची कामगिरी उंचावली. 

ऍटलेटोकीच्या आशा कायम 
माद्रिद ः अल्वारो मोराता याच्या पूर्वार्धातील दोन गोलमुळे ऍटलेटोकी माद्रिदने रेयाल सोशिएदादला पराभूत केले. यामुळे आता ऍटलेटोकी आणि आघाडीवरील बार्सिलोना यांच्यात सात गुणांचा फरक आहे. रेयाल बेटीस तसेच रेयाल माद्रिदविरुद्धच्या पराभवानंतर ऍटलेटोकी मार्गावर आले. दरम्यान, गेताफेने चॅंपियन्स लीग पात्रतेच्या आशा उंचावताना रेयाल बेटीसला 2-1 हरवले. या विजयामुळे गेताफे चौथ्या क्रमांकावर गेले, पण अन्य सात संघ या स्पर्धेत असल्याने गेताफेला प्रवेश निश्‍चित मानता येणार नाही. 

युव्हेंटिसची नापोलीवर मात 
युव्हेंटिसने सिरी एमधील हुकूमत राखताना नापोलीचा 2-1 असा पाडाव केला. उत्तरार्धात खेळ उंचावलेल्या युव्हेंटिसने आता अग्रस्थान भक्कम करताना अन्य संघांना 16 गुणांनी मागे टाकले आहे. या मोठ्या आघाडीमुळे युव्हेंटिसचे विजेतेपद जवळपास निश्‍चित मानले जात आहे.

संबंधित बातम्या