'विश्वकरंडकासाठी राहुल भारतीय संघात पाहिजेच'

वृत्तसंस्था
Monday, 1 October 2018

भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांनी आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी के. एल. राहुल भारतीय संघात हवाच असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांनी आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी के. एल. राहुल भारतीय संघात हवाच असे म्हटले आहे.

कपिल देव म्हणाले, की भारतीय संघ व्यवस्थापनाला राहुलला सलामीला खेळवायचे नसेल तर त्याला मधल्या फळीत स्थान द्यावे. राहुलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे. तसेच आशिया करंडकातही त्याने अर्धशतक झळकाविले होते. भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला संधी द्यायला हवी. विश्वकरंडकात त्याची कामगिरी नक्की चांगली असेल. विश्वकरंडक स्पर्धेस अजून आठ महिन्याचा कालावधी शिल्लक असून, आताच तयारी केली पाहिजे. टी-20 मध्ये त्याची कामगिरी चांगली असून, सलामीऐवजी त्याला मधल्या फळीत खेळवावे.

आशिया करंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाचेही कपिल देव यांनी कौतुक केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी प्रभावित करणारी ठरली. मालिकावीर ठरलेल्या शिखऱ धवनने उष्ण वातावरणात चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले, असे कपिल देव यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या