French Open Badminton : श्रीकांतचा पहिल्या फेरीत विजय

वृत्तसंस्था
Wednesday, 24 October 2018

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतनेही पहिल्याच फेरीत हाँगकाँगच्या वॉंग वी की व्हिन्सेंटला पराभूत करत फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या व्हिन्सेंटवर 21-19, 21-13 असा विजय मिळवत श्रीकांतने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. 

ओडेन्स : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतनेही पहिल्याच फेरीत हाँगकाँगच्या वॉंग वी की व्हिन्सेंटला पराभूत करत फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या व्हिन्सेंटवर 21-19, 21-13 असा विजय मिळवत श्रीकांतने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. 

पहिल्या गेममध्ये श्रीकांतने सावध खेळ करत 3-1 अशी आघाडी घेतली. मात्र व्हिन्सेंटने चार गुण घेत 5-5 अशी बरोबरी साधली. मात्र श्रीकांतने पुन्हा सलग चार 9-5 अशी आघाडी घेतली. मध्यांतरापर्यंत श्रीकांत 11-7 असा पुढे होता. त्यानंतर व्हिन्सेंटने चांगला प्रतिकार करत 19-19 अशी बरोबरी साधत सामन्यात चुरस निर्माण केली. मात्र त्याला श्रीकांतला रोखण्यात अपयश आले. त्यामुळे श्रीकांतने पहिला गेम 21-19 अशा फरकाने जिंकला. 

दुसऱ्या गेममध्येही श्रीकांतने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरवात केली. श्रीकांतने 6-2 अशी आघाडी घेतली मात्र, व्हिन्सेंटने प्रतिकार करत चार गुण कमविले आणि गुणांचा फरक 6-4 असा कमी केला. मात्र व्हिन्सेंटला श्रीकांतच्या अचूक फटक्यांचा प्रतिकार करण्यात अपयश आले. त्यामुळे तो 10-16 असा मागे पडला. त्यानंतर श्रीकांतने घेतलेली आघडी कायम राखत 21-13 असा फरकाने दुसरा गेम जिंकत सामन्यात सरळ दोन सेटमध्ये बाजी मारली.                                                      

संबंधित बातम्या