चायना ओपन सुपर बॅडमिंटनमध्ये श्रीकांतचीही विजयी सलामी

वृत्तसंस्था
Wednesday, 7 November 2018

भारतीय जोडीने गेल्याच आठवड्यात प्रतिष्ठेच्या फ्रेंच स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. हा पराक्रम केलेली ती पहिली भारतीय पुरुष जोडी ठरली होती. आता त्यांची लढत वाहयू नायाका आर्या - आदे युसूफ सॅंतोसो या इंडोनेशियाच्या जोडीविरुद्ध होईल. सात्विक-अश्विनीला मिश्र दुहेरीत सलामीलाच हार पत्करावी लागली आहे. 

मुंबई : सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने सातव्या मानांकित जोडीला हरवून चायना ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच केली, तर किदांबी श्रीकांतनेही या स्पर्धेत सलामीच्या लढतीत एकतर्फी विजय मिळवला. 

फुझोओ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चिराग-सात्विकने मॅडस पिएलेर कोल्डिंग-मॅडस्‌ कॉनराड पीटरसन यांना 23-21, 24-22 असे नमवले. भारतीय जोडीने डेन्मार्कच्या जोडीला 53 मिनिटांत पराजित केले. अनुभवी डच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सात्विक-चिराग यांनी मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावला. त्यांनी दोन्ही गेममध्ये चौथा गुण सत्कारणी लावला. खरं तर भारतीय जोडीला दुसऱ्या गेममध्ये 13-8 आघाडीनंतर स्वीकारावी लागलेली 17-18 पिछाडी सलत असेल. 

भारतीय जोडीने गेल्याच आठवड्यात प्रतिष्ठेच्या फ्रेंच स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. हा पराक्रम केलेली ती पहिली भारतीय पुरुष जोडी ठरली होती. आता त्यांची लढत वाहयू नायाका आर्या - आदे युसूफ सॅंतोसो या इंडोनेशियाच्या जोडीविरुद्ध होईल. सात्विक-अश्विनीला मिश्र दुहेरीत सलामीलाच हार पत्करावी लागली आहे. 

पाचव्या मानांकित किदांबी श्रीकांतने फ्रान्सच्या ल्युकास कॉर्वी याला 21-12, 21-16 असे हरवले. पहिल्या गेममध्ये 11-7 आणि दुसऱ्या गेममध्ये 11-9 आघाडीनंतर श्रीकांतने एकतर्फी वर्चस्व राखले. दरम्यान, वैष्णवी जाका रेड्डीच्या पराभवामुळे महिला एकेरीतील आशा पी. व्ही. सिंधूवरच आहे. एच. एस. प्रणॉयलाही पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली. त्याने इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीविरुद्ध 11-21, 14-21 अशी एकतर्फी हार पत्करली. 

संबंधित बातम्या