French Open Badminton : श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक

वृत्तसंस्था
Thursday, 25 October 2018

पॅरिस : भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने कोरियाच्या ली डॉंग क्युनवर मात करत फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानावर असलेल्या लीवर श्रीकांतने 12-21, 21-16, ,21-18 अशी मात केली.

पहिल्या गेमध्ये श्रीकांतने पहिले दोन गुण गमावल्यानंतर कमालीचा खेळ करत 6-2 अशा आघाडी घेतली. मात्र त्यानंतर लीने पुन्हा आक्रमक खेळ करत गुणांमधील फरक दूर केला. त्याने श्रीकांतला मागे टाकत 13-10 अशा आघाडी घेतली. त्यानंतर त्याने आक्रमक खेळ कायम राखत पहिला गेम 21-12 अशा फरकाने जिंकला. 

दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने सुरवातीला 3-1 अशी आघाडी घेतली. मात्र पहिल्या गेमप्रमाणेच त्याला घेतलेली आघाडी राखण्यात अपयश आले. लीने प्रतिकार करत 6-6 अशी बरोबरी साधली. त्यानंतर मात्र श्रीकांतने खेळ उंचावत 19-14 अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याने लीला फक्त दोन गुण दिले आणि दुसऱ्या गेममध्ये 21-16 अशी बाजी मारली. 

तिसरा गेम अधिक चुरशीचा झाला. यात लीने पुनरागमन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत श्रीकांतने तिसरा गेम २१-१८ असा जिंकला. 

संबंधित बातम्या