भारतीय खो-खो महासंघाची उदयोन्मुख खेळाडूंसाठी स्कॉलरशिप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 March 2019

खेळाडूंच्या यासमस्येचे निराकारण करण्यासाठी भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष श्री. सुधांशू मित्तल यांनी जानेवारीत बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या खेलो इंडीया युथ गेम्स च्या समारोप प्रसंगी उदयोन्मुख खो-खो खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती जाहिर केली होती.

मुंबई : खो-खो या भारतीय खेळाचे बरेच खेळाडू समाजातील आर्थिकदृष्टया मागासस्तरातून येतात, आर्थिक चणचण अनेक प्रतिभावंत खो-खो खेळाडूंच्या क्रीडा कारकिर्दित अडचण ठरते. खेळाडूंच्या यासमस्येचे निराकारण करण्यासाठी भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष श्री. सुधांशू मित्तल यांनी जानेवारीत बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या खेलो इंडीया युथ गेम्स च्या समारोप प्रसंगी उदयोन्मुख खो-खो खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती जाहिर केली होती.

खेलो इंडिया युथ गेम्स अंतर्गत खो-खो स्पर्धेत 17 व 21 वर्ष वयोगटातील मुले व मुली विभागातील प्रथम ४ मानांकित अशा 16 संघातील सर्व खेळाडूंना एक वर्ष, दरमहा रू. 1000/- प्रमाणे प्रत्येकी रू.12,000/- असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.

भारतीय खो-खो महासंघाने या खेळाडूकेंद्रीत निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून 192 खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी 12,000/- रूपये जमा केल्याची माहिती भारतीय खो-खो महासंघाचे सह-सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दिली. खेळाडू शिष्यवृत्ती व प्रशिक्षकांची बक्षिसे यांची एकत्रित रक्कम 25 लाखापर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या