'खेलो इंडिया' पुण्यात होणार? 

संजय घारपुरे
Monday, 1 October 2018

मुंबई :  केंद्रीय क्रीडा खात्याचा महत्त्वाकांक्षी "खेलो इंडिया क्रीडा महोत्सव' जानेवारीत पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होण्याची दाट शक्‍यता आहे. या संदर्भात दिल्लीतील केंद्रीय क्रीडा खात्याचे पदाधिकारी या आठवड्यात क्रीडा संकुलास भेट देतील आणि त्यानंतरच याबाबतची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. 

सतरा वर्षांखालील वयोगटासाठी असलेल्या या क्रीडा महोत्सवाच्या संकल्पनेला ऑलिंपिक रौप्यपदक विजेते राज्यवर्धन राठोड क्रीडामंत्री झाल्यावर चालना मिळाली. भारतीय ऑलिंपिक संघटना, तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनांचा या स्पर्धेस असलेला विरोध झुगारून या वर्षी जानेवारीत हा महोत्सव दिल्लीत झाला होता. त्यात महाराष्ट्राने उपविजेतेपद मिळविले होते. आता या स्पर्धेच्या संयोजनाची संधीच महाराष्ट्रास देण्यात आली आहे. 
या स्पर्धा महोत्सवाच्या निमित्ताने बालेवाडीतील क्रीडासुविधांना नव्याने झळाळी मिळेल. त्यासाठी तरतूदही करण्यात आली आहे. या संयोजनाचा प्रामुख्याने खर्च केंद्र सरकारच करणार आहे. त्या दृष्टीने राज्यातील क्रीडा अधिकाऱ्यांनी बालेवाडीतील सुविधांचा अभ्यास करून अंदाजपत्रक तयार केले आहे. त्याबाबतच्या कामाला लवकरच सुरवातही होईल. त्याचबरोबर येथील सुविधा अत्याधुनिक करताना येथील मॅट्‌स, टार्गेट्‌स जिल्हा क्रीडा संकुलात सरावासाठी देण्याचा विचार आहे. 

15 जानेवारीपासून स्पर्धा, 18 खेळ? 
पहिल्या खेलो इंडियात 16 खेळांचा समावेश होता आणि त्यात 209 सुवर्णपदके देण्यात आली होती. त्यात दोन खेळ वाढवले जाण्याची दाट शक्‍यता आहे. त्याचा निर्णय काही दिवसांत होईल. ही स्पर्धा जानेवारीत अपेक्षित आहे. आत्ताच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारीस उद्‌घाटन सोहळा अपेक्षित आहे. पहिला महोत्सव 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान झाला होता. 
 
संबंधित बातम्या