अष्टहजारी षटकार खेचल्यानंतर 'गिरिप्रेमी'ची कांचनगंगाला साद 

मुकुंद पोतदार 
Sunday, 30 September 2018

पुणे-  षटकार खेचल्यानंतर पुढील चेंडू सावधपणे खेळावा, असे म्हटले जाते; पण टी-20 क्रिकेटचा जमाना सीमापार चेंडूंचा असतो. जगातील सर्व 14 अष्टहजारी शिखरे सर करण्याची संस्थात्मक महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या "गिरिप्रेमी'ने असाच पवित्रा घेतला आहे. एव्हरेस्टसह सहा अष्टहजारी शिखरे सर केल्यानंतर कांचनगंगा शिखराची मोहीम पुढील वर्षी आखण्यात आली आहे. 

पुणे-  षटकार खेचल्यानंतर पुढील चेंडू सावधपणे खेळावा, असे म्हटले जाते; पण टी-20 क्रिकेटचा जमाना सीमापार चेंडूंचा असतो. जगातील सर्व 14 अष्टहजारी शिखरे सर करण्याची संस्थात्मक महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या "गिरिप्रेमी'ने असाच पवित्रा घेतला आहे. एव्हरेस्टसह सहा अष्टहजारी शिखरे सर केल्यानंतर कांचनगंगा शिखराची मोहीम पुढील वर्षी आखण्यात आली आहे. 

या मोहिमेसाठी सात एव्हरेस्टवीरांसह तब्बल 12 जणांचा संघ मोहिमेचा लीडर उमेश झिरपेने नुकताच जाहीर केला. चार अष्टहजारी शिखरे सर केलेला आशिष माने, गणेश मोरे, प्रसाद जोशी, भूषण हर्षे, रूपेश खोपडे, आनंद माळी, कृष्णा ढोकळे या सात एव्हरेस्टवीरांसह डॉ. सुमीत मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर, जितेंद्र गवारे, वरुण भागवत यांचा मोहिमेत समावेश आहे. 

कांचनगंगा हे भारतातील सर्वोच्च व जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. याची उंची 8586 मीटर इतकी आहे. 2012 मध्ये गिरीप्रेमीने एव्हरेस्टची अकरा जणांची सर्वात मोठी नागरी मोहीम काढली. त्यानंतर पाच अष्टहजारी शिखरे सर करण्यात आली. सातव्या मोहिमेसाठी पुन्हा मोठे पथक तयार करण्यात आले आहे. सिक्कीममधील नागरिकांच्या श्रद्धेमुळे भारतातून चढाई करता येत नाही. त्यामुळे ही मोहीम नेपाळमार्गे जाईल. 

खऱ्या अर्थाने इको मोहीम 
ही मोहीम इको असेल. याबद्दल प्रा. डॉ. अविनाश कांदेकर यांनी सांगितले, आम्ही शिखर परिसरात नेऊन वापरलेल्या वस्तूंचे अवशेष परत आणण्यापुरती त्याची व्याप्ती नसेल. हे तर गिर्यारोहकांचे कर्तव्यच असते. कांचनगंगा परिसर निसर्गसंपन्न आहे. येथे तब्बल 120 हिमनद्या असून त्यावर सुमारे 50 लाख लोकांचे जीवन अवलंबून आहे. या परिसरातील वनस्पती, झाडे, दगड, माती, आदींचे नमुने शास्त्रोक्त पद्धतीने आणण्यात येतील. त्यासाठी शास्त्रज्ञ, तज्ज्ञही आमच्याबरोबर बेस कॅंपपर्यंत येतील. 

मदतीचे आवाहन 
मोहिमेसाठी शेर्पांचे शुल्क, ऑक्‍सिजन सिलिंडर्स, साधनसामग्री आणि नेपाळ सरकारचे परवाना शुल्क मिळून दोन कोटी 15 लाख रुपये खर्च आहे. त्यातील 60 लाख रुपये आतापर्यंत जमले आहेत. त्यामुळे मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मदतीसाठी संपर्क - 7767031975, 9822323147

संबंधित बातम्या