French Open Badminton : दुहेरीतही भारतीय महिलांचा सहज विजय

वृत्तसंस्था
Wednesday, 24 October 2018

फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधू आणि साईना नेहवालने विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत धडक मारली. तसेच महिला दुहेरीतही मेघना जक्कमपुडी आणि पूर्वीशा एस राम यांनीही पहिल्या फेरीत विजय मिळविला. 

पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधू आणि साईना नेहवालने विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत धडक मारली. तसेच महिला दुहेरीतही मेघना जक्कमपुडी आणि पूर्वीशा एस राम यांनीही पहिल्या फेरीत विजय मिळविला. 

मेघना आणि पूर्वीशा यांनी बेल्जियमच्या लिसे जॅक्यूस आणि फ्लोर व्हॅनह्युकला 21-12, 21-12 असे पराभूत केले. मेघना आणि पूर्वीशा सध्या जागतिक क्रमवारीत 35 व्या स्थानावर आहेत. त्यांनी सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करत जागतिक क्रमवारीत 67 व्या स्थानावर असेलल्या लिसे आणि फ्लोर यांना सहज पराभूत केले. 

तत्पूर्वी फ्रेंच ओपन स्पर्धेचा दुसरा दिवस भारतासाठी चांगला गेला. आज किदांबी श्रीकांत आणि साईना नेहवाल या दोघांनीही दुसऱ्या फेरीत धडक मारली. 

संबंधित बातम्या