Asia Cup 2018 : दुसऱ्यांदा सामना 'टाय' करणारा जडेजा

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

आशिया करंडकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविण्याजवळ गेलेल्या भारतीय संघ रवींद्र जडेजा बाद झाल्याने टाय झाला. जडेजाने अशी कामगिरी यापूर्वीही केली आहे.

दुबई : आशिया करंडकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविण्याजवळ गेलेल्या भारतीय संघ रवींद्र जडेजा बाद झाल्याने टाय झाला. जडेजाने अशी कामगिरी यापूर्वीही केली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला विजयासाठी दोन चेंडूत एक धावेची गरज असताना जडेजा बाद झाला आणि भारताचा डाव संपुष्टात आला. त्यामुळे विजयापासून भारतीय संघ दुर राहिला. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी हा सामना विजय मिळविल्याप्रमाणे आनंदात साजरा केला. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमाविलेला नाही. त्यामुळे भारताला हा टाय झालेला सामना खूप जिव्हारी लागला.

जडेजाने यापूर्वीही असेच काही केलेले आहे. त्याने 25 जानेवारी 2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दोन चेंडूत एक धाव हवी असताना तो बाद झाला होता आणि सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे जडेजाच्या या कामगिरीची सोशल मीडियावरून खिल्ली उडविण्यात येत आहे. जडेजाने आतापर्यंत या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे. त्याने काही वर्षांनंतर भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे.

संबंधित बातम्या