भारताचा संघ नंबर वन, पण आम्ही लढू : मुर्तझा

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की भारताचा संघ मजबूत आहे आणि ते जगातील नंबर वन टीम आहे. पण, आम्ही त्यांच्याविरोधात लढू असे बांगलादेशचा कर्णधार मुश्रफी मुर्तझाने म्हटले आहे.

अबुधाबी : आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की भारताचा संघ मजबूत आहे आणि ते जगातील नंबर वन टीम आहे. पण, आम्ही त्यांच्याविरोधात लढू असे बांगलादेशचा कर्णधार मुश्रफी मुर्तझाने म्हटले आहे.

बांगलादेशने आशिया करंडकात पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानसमोर विजयासाठी अवघे 240 धावांचे आव्हान होते. पण, त्यांना ते पेलविले नाही आणि पाकिस्तान 202 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पाकिस्तानच्या कामगिरी क्रिकेटविश्वात जोरदार टीका करण्यात येत आहे. तर, बांगलादेशच्या जिगरबाज कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

कर्णधार मुर्तझानेही बांगलादेशच्या खेळाडूंचे कौतुक केले आहे. मुर्तझा म्हणाला, की आम्ही या सामन्यात मुस्तफिजूर आणि मेहेंदी यांच्या गोलंदाजीने सुरवात केली आणि याचा फायदा आम्हाला झाला. पाकिस्तानने सुरवातीला विकेट गमाविल्या. मुशफिकूर रहिमने सर्वोत्तम फलंदाजी केली. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत आमची कामगिरी सरस राहिली. शाकिब आणि तमीम यांची उणीव अंतिम सामन्यात आम्हाला भासेल. भारताविरुद्ध आमचे खेळाडू स्वाभाविक खेळ करतील आणि आमचे खेळाडू सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करतील.

संबंधित बातम्या