'वर्ल्ड कप'साठी भारतही 'आयपीएल'कडे दुर्लक्ष करणार..?

वृत्तसंस्था
Thursday, 8 November 2018

मुंबई : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणारी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा लक्षात घेता भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये जसप्रित बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि महंमद शमी या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्याची मागणी केली आहे. 
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वकरंडकासाठी भारताचे प्रमुख गोलंदाज 'फ्रेश आणि फिट' असावेत असा यामागचा हेतू आहे. 

प्रशासकीय समिती आणि विराट कोहली यांच्यात झालेल्या बैठकीत कोहलीने भारताच्या प्रमुख गोलंदाजांना आयपीएलमध्ये सहभागी न करण्याचे मत व्यक्त केले. मात्र, यावर अजूनही अंतिम निर्णय करण्यात आलेला नाही. विश्वकरंडक स्पर्धेमुळे पुढील वर्षी होणारी आयपीएल स्पर्धी 29 मार्च ते 19 मे या कालावधीत खेळली जाणार आहे. त्यानंतर अवघ्या 18 दिवसांनंतर म्हणजेच 30 मे ला विश्वकरंडकातील पहिली लढत होईल. 

यो दोन्ही स्पर्धांमध्ये केवळ 18 दिवसांचा कालवधी असल्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही आयपीएलमधून लवकर मायदेशी परतणार असल्याची दाट शक्यता आहे. 

भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यातील असमाधामकारक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद राय आणि डायना इडुल्जी यांनी चर्चेचे आयोजन केले होते. या चर्चेस विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मार्गदर्शक रवी शास्त्री आणि निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आदी उपस्थित होते. 

प्रशासकीय समितीने आपीएलचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष हेमांग अमिन यांच्याशी चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. हेमांग यांनी याबाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संघांच्या मालकांना याविषयी माहिती देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन समजले. तसेच कोहली, रोहित आणि रहाणे यांनी फलंदाजांनी विश्रांती देण्याची मागणी केलेली नसल्याचे समजते.

संबंधित बातम्या