दुसऱ्या कसोटीसही पृथ्वी शॉ मुकणार? 

वृत्तसंस्था
Thursday, 6 December 2018

ज्या प्रकारे त्याला दुखापत झाली ते पाहणे वेदनादायी होते; परंतु या दुखापतीतून तो सावरत आहे. आता त्याने चालण्यास सुरवात केली आहे. या आठवड्यापर्यंत तो धावू लागेल, हे त्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. 

ऍडलेड : सराव सामन्यात घोटा दुखावलेला हरहुन्नरी सलामीवीर पृथ्वी शॉ मेलबर्न येथे नाताळच्या दुसऱ्या दिवशी (बॉक्‍सिंग डे) सुरू होणाऱ्या कसोटीत खेळण्याची शक्‍यता नाही, असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली. ही शक्‍यता असल्यामुळे तो पुढील आठवड्यातील दुसऱ्या सामन्यातही खेळणार नाही, हे निश्‍चित झाले आहे. 

आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या काही दिवस अगोदर झालेल्या सराव सामन्यात सीमारेषेवर झेल पकडताना पाय घोट्यातून फिरला. परिणामी, त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याला उचलूनच मैदानाबाहेर न्यावे लागले, एवढ्या वेदना त्याला होत होत्या. 

ज्या प्रकारे त्याला दुखापत झाली ते पाहणे वेदनादायी होते; परंतु या दुखापतीतून तो सावरत आहे. आता त्याने चालण्यास सुरवात केली आहे. या आठवड्यापर्यंत तो धावू लागेल, हे त्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. तरुण असल्यामुळे त्याच्याबाबत तंदुरुस्त होण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते, असे शास्त्री यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या