World Cup 2019 : विश्रांती म्हणजे काय भाऊ? आयपीएलनंतर भारतीय लगेचच इंग्लंडला जाणार!

वृत्तसंस्था
Monday, 18 March 2019

जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकासाठी भारतीय संघ 22 मेला इंग्लंडला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयपीएलचा अंतिम सामना 19 मार्चला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना विश्वकरंडकापूर्वी केवळ दोन दिवसांची विश्रांती मिळणार आहे.

नवी दिल्ली : जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकासाठी भारतीय संघ 22 मेला इंग्लंडला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयपीएलचा अंतिम सामना 19 मार्चला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना विश्वकरंडकापूर्वी केवळ दोन दिवसांची विश्रांती मिळणार आहे.

विश्वकरंडकापूर्वी भारतीय संघ 25 मेला ओव्हलच्या मैदानावर न्यूझींलडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. तसेच दुसरा सराव सामना 28 मेला कार्डिफच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाच जूमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 

आयपीएलचा अंतिम सामना 19मे ला झाला तर भारतीय संघाला इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घ्यायला केवळ 13 दिवस मिळत आहेत. भारताचा विश्वकरंडकासाठीचा संघ 23 एप्रिलपूर्वी जाहीर करण्यात येणार आहे तर संघात काही बदल असेल तर तो 30 एप्रिलपूर्वी करणयात येणार आहे.  

यंदाच्या आयपीएलच्या मोसमातील कामगिरी विश्वकरंडकासाठी संघा निवडण्यात महत्त्वाची ठरेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. 

संबंधित बातम्या