अफगाणविरुद्धच्या 'टाय'ला पंच जबाबदार : धोनी

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

कर्णधाराचे बोल 
- आमचे चुकले असे म्हणणे अयोग्य 
- प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्याने आमचा संघ हॅंडीकॅप (गोल्फच्या परिभाषेत) 
- चेंडू पूर्ण स्विंग होत नसताना टप्पा महत्त्वाचा असतो, हे मध्यमगती गोलंदाजांनी शिकायला हवे 
- टप्प्याशी जुळवून घेण्यात चार-पाच षटके गेली 
- फटक्‍यांची अधिक योग्य निवड हवी होती 
- काही धावचीतचाही फटका 
- आम्ही हरण्याची शक्‍यता होती, त्यामुळे बरोबरीही समाधानकारक 

दुबई : कारकिर्दीतील नेतृत्वाच्या दोनशेव्या लढतीत अफगाणिस्तानसारख्या कमकुवत संघाविरुद्धही विजय न मिळवता आल्याने भारताचा प्रभारी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नाराज होता. त्याने मध्यमगती गोलंदाजांना यासाठी जबाबदार धरतानाच पंचांच्या चुकीमुळे विजय दुरावल्याचे स्पष्ट संकेत दिले. भारतीय संघाने नियमांच्या चौकटीत राहून पंचांवर हल्ला केला. 

सामन्यानंतरच्या बक्षीस वितरण कार्यक्रमा वेळी धोनीने भारतीय खेळाडूंकडून घडलेल्या चुका सांगितल्या. त्या सांगतानाच मोक्‍याच्या वेळी फलंदाज धावचीत झाले, हे सांगतानाच काही गोष्टींबाबत मी बोलणार नाही. ते बोलल्यास मला दंड होईल, असे सांगत पंचांच्या चुकीचा फटका बसला असल्याचे सूचित केले. 

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत के.एल. राहुलने धोनीचा मुद्दा जास्त स्पष्ट केला. तो म्हणाला, की मला बाद ठरवण्यात आल्यावर डीआरएस घेतला नसता, तर संघाला जास्त फायदा झाला असता. मी बाद झालो, त्या वेळी मी यष्टींच्या रेषेत नसल्याचे मला वाटले होते, त्यामुळे मी दाद मागितली होती. मी रिव्ह्यू घेतला नसता, तर तो त्यानंतर नक्कीच उपयोगी पडला असता. 

दिनेश कार्तिक, तसेच महेंद्रसिंह धोनी यांना बाद ठरवण्याचा निर्णय चुकीचा होता. आपण डीआरएस घेऊन तो वाया घालवला नसता, तर धोनी आणि कार्तिकची विकेट राखता आली असती, असेच राहुलचे म्हणणे होते. त्याने त्याचमुळे मधली फळी कोलमडली, हेही मान्य केले नाही. आमच्या डावाच्या मधल्या षटकात फलंदाजी अवघड होती. चेंडू कमी वेगाने येत होता; तसेच जास्त फिरकीही घेत होता. दिनेश कार्तिकने केदार जाधवसह चांगली खेळी केली होती, असेही तो म्हणाला. 

कर्णधाराचे बोल 
- आमचे चुकले असे म्हणणे अयोग्य 
- प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्याने आमचा संघ हॅंडीकॅप (गोल्फच्या परिभाषेत) 
- चेंडू पूर्ण स्विंग होत नसताना टप्पा महत्त्वाचा असतो, हे मध्यमगती गोलंदाजांनी शिकायला हवे 
- टप्प्याशी जुळवून घेण्यात चार-पाच षटके गेली 
- फटक्‍यांची अधिक योग्य निवड हवी होती 
- काही धावचीतचाही फटका 
- आम्ही हरण्याची शक्‍यता होती, त्यामुळे बरोबरीही समाधानकारक 

संबंधित बातम्या