World Cup 2019 : रायुडूची खेळी बघा, तरी त्याला का वगळलंय? आयसीसीचा सवाल

वृत्तसंस्था
Wednesday, 17 April 2019

रायुडूला संघात जागा न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आता आयसीसीनेसुद्धा बीसीसीआयला रायुडूची आकडेवारी देत रायुडू संघात हवा असे वाटत नाही का? असा प्रश्न विचारला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : जून महिन्यात होणाऱ्या वि्वकरंडक स्पर्धेसाठी सोमवारी (ता.15) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यसाठी सर्वाधिक चर्चेत असलेल्या अंबाती रायुडूला स्थान न देता विजय शंकरची निवड करण्यात आली. रायुडूला संघात जागा न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आता आयसीसीनेसुद्धा बीसीसीआयला रायुडूची आकडेवारी देत रायुडू संघात हवा असे वाटत नाही का? असा प्रश्न विचारला आहे. 

आयसीसीने भारतीय खेळाडूंच्या 20 डावांची सरासरी काढली आहे. यामध्ये रायुडू 47.05 एवढ्या सरासरीसह चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सलामीवीर रोहित शर्मानंतर अंबाती रायुडूचा नंबर लागतो. या यादीत रायुडूने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकरला मागे टाकले आहे. सचिन या यादीत पाचव्या स्थानावर आहे. 

आयसीसीने या पोस्टला ''रायुडूला भारताच्या वर्ल्डकप संघातून वगळण्यात आलं आहे. त्याचा संघात समावेश व्हायला हवा होता असे वाटत नाही का?'' असे कॅप्शन दिले आहे. 

संबंधित बातम्या