Asia Cup 2018 : 'महेंद्रसिंह धोनीची विकेट घ्यायला मला आवडेल'
दुबई : भारताचा सर्वांत अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनीचा बळी घ्यायला मला आवडेल, असे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने म्हटले आहे.
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची लढत 19 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. या लढतीपूर्वी वाकयुद्ध सुरु झाले असून, पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंकडून आताच भारतीय खेळाडूंना लक्ष्य करण्यात येत आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हसन अलीने नुकताच दावा केला होता, की मी भारताच्या सगळ्या विकेट घेणार. चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत हसन अलीने भारताचे तीन बळी घेतले होते. त्याने यंदाही अशीच कामगिरी करण्याचे ठरविले आहे. देशासाठी जास्तीत जास्त विकेट घेण्याची माझी इच्छा आहे. हसन अलीने योयो टेस्टमध्ये 19.8 गुण मिळविले होते.