Asia Cup 2018 : पंचांच्या कामगिरीविषयी मी बोललो असतो.. ; पण... : धोनी

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

''आम्ही वाईट कामगिरी केली असे मला वाटतं नाही, आम्ही प्रमुख खेळाडूंना आराम दिला होता. चेंडू स्विंग होत नसल्याने आमच्या गोलंदाजांनी ठराविक टप्प्यावर गोलंदाजी करणे गरजेचे होते. तसेच फलंदाजीतही आम्ही चुकीचे फटके मारुन बाद झालो. त्यासोबतच अशा काही गोष्टीही घडल्या ज्यावर मी बोलू इच्छित नाही कारण मला दंड भरायचा नाही.''

दुबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पंचानी पायचित ठरवत बाद असल्याचा निर्णय दिला. मूळात तो बाद नसल्यामुळे सामना झाल्यावर प्रेझेंटेशनच्यावेळी रमीझ राजा यांच्याशी बोलताना त्याने ''काही गोष्टींबाबत मी बोलू शकत नाही नाहीतर मला दंड होईल,'' असे म्हणत त्याने पंचावर निशाणा साधला आहे.

सामन्यानंतर बोलताना रमीझ राजा यांनी धोनीला पराभवाची कारणे विचारली त्यावर तो म्हणाला, ''आम्ही वाईट कामगिरी केली असे मला वाटतं नाही, आम्ही प्रमुख खेळाडूंना आराम दिला होता. चेंडू स्विंग होत नसल्याने आमच्या गोलंदाजांनी ठराविक टप्प्यावर गोलंदाजी करणे गरजेचे होते. तसेच फलंदाजीतही आम्ही चुकीचे फटके मारुन बाद झालो. त्यासोबतच अशा काही गोष्टीही घडल्या ज्यावर मी बोलू इच्छित नाही कारण मला दंड भरायचा नाही.''

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंचांनी धोनीला पायचित ठरवत बाद असल्याचे सांगितले. मात्र, रिव्ह्यूमध्ये तो चेंडू स्टम्पच्या बाहेर जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. पण भारताकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने धोनीने नाराजी व्यक्त केली होती. तसाच प्रकार दिनेश कार्तिकच्या बाबतही घडला. त्यामुळे या दोन निर्णयावर धोनीने काहीही न बोललेलेच बरे असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.  

संबंधित बातम्या