'मला कोणाला सिद्ध करून दाखविण्याची गरज नाही'

वृत्तसंस्था
Sunday, 30 September 2018

भारतीय संघात निवड होऊनही अंतिम अकरामध्ये कमी संधी मिळालेल्या करुण नायरने सतत कमी संधी मिळाल्याबद्दल कधीही संघ व्यवस्थापनाशी बोलले नसल्याचे म्हटले आहे.​

नवी दिल्ली : भारतीय संघात निवड होऊनही अंतिम अकरामध्ये कमी संधी मिळालेल्या करुण नायरने सतत कमी संधी मिळाल्याबद्दल कधीही संघ व्यवस्थापनाशी बोलले नसल्याचे म्हटले आहे.

आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातून करूण नायरला वगळण्यात आले आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान देण्यात आले होते. पण, अंतिम अकरामध्ये त्याला एकही सामन्यात संधी मिळाली नाही. या मालिकेत भारताला 4-1 असा दारूण पराभव स्वीकारावा लागला तरीही. करुणने कसोटीत त्रिशतक झळकाविलेले आहे. तरी त्याने आतापर्यंत फक्त तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्याउलट हनुमा विहारी या नवख्या खेळाडूला इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यात स्थान देण्यात आले.

नायर म्हणाला, की त्रिशतक करून मला दोन वर्षे होऊन गेली आहेत आणि आता बराच काळ गेला आहे. मला कमी संधी मिळाल्या आहेत, याबाबत मला वाईट वाटत नाही, त्याचा विचार मी करत नाही. भविष्यात काय करायचे याकडे मी बघत आहे. माझ्यासाठी हे निराशाजनक आहे असे मी मानत नाही. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर धावा करू शकतो, हे मी सिद्ध करून दाखविलेले आहे. त्यामुळे काही सिद्ध करून दाखविण्याची गरज नाही. मला स्वतःबद्दल आत्मविश्वास आहे.

संबंधित बातम्या