INDvsAUS : 'कॉफी विथ करण' भोवली; पंड्या, राहुल 'टीम इंडिया'बाहेर!

वृत्तसंस्था
Friday, 11 January 2019

भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांना अखेर पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे

सिडनी : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांना अखेर पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर दोन एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घालण्यात यावी अशी शिफारस बीसीसीआय'च्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी केली होती. 

''संघ व्यवस्थापनाने पंड्याला पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांना अजूनही अंतिम सूचना देण्यात आलेली नाही. लोकेश राहुलचा मुळातच खराब कामगिरीमुळे अंतिम संघात विचार केला जात नव्हता. हे निलंबन तातपुरते आहे का त्यांना मायदेशात पाठविण्यात येणार आहे याबाबत अजूनही संघ व्यवस्थापनाला अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.    

रविवारी प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमात पंड्या महिलांविषयी पूर्वग्रहदूषित आणि अश्‍लील वक्तव्य केले. त्याचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. त्याने माफी मागितली असली तरी समितीने त्याला व राहुलला कारणे दाखवा नोटीस बजावली. पंड्याने खेद व्यक्त करीत अशा गैरवर्तनाची पुनरावृत्ती करणार नाही अशी ग्वाही दिली. राय मात्र त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नव्हते. म्हणनूच त्यांनी पंड्या आणि राहुलवर बंदीची मागणी केली होती. 
 

संबंधित बातम्या