INDvsWI : हरभजन संतापला; म्हणाला.. 'निवड समिती नक्की काय करते'

वृत्तसंस्था
Monday, 1 October 2018

नवी दिल्ली : भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आल्याबद्दल निवड समीतीवर चांगलीच टीका केली आहे. 

वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 4 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. आशिया करंडकात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी संघात स्थान न मिळाल्याने हरभजनने निवड समितीला याचा जाब विचारत आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

''वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी संघात रोहित शर्माला स्थान नाही. निवड समिती काय विचार करते याचा कोणाला अंदाज आहे का? असेल तर मलाही कळवा, माझ्या यावर विश्वास बसत नाही.'' अशा आशयाचे ट्विट करत त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

रोहितने आशिया करंडकात भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सातव्यांदा आशिया करंडकाचे विजेतेपद पटकावले. तसेच त्याने पाच सामन्यांमध्ये 105.67च्या सरासरीने 317 धावा केल्या. रोहितने यंदा जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मात्र या मालिकेत त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्याने चार डावांमध्ये 19.50च्या सरासरीने अवघ्या 78 धावा केल्या होत्या. त्याची हीच कामगिरी लक्षात घेता त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून तसेच इंग्लंड दौऱ्यातील कसोटी संघातूनही वगळ्यात आले.  

आशिया करंडकातील चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याला कसोटी संघात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र निवड समितीने युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यास पसंती दिली आहे.     

संबंधित बातम्या