'चांगल्या कामगिरीनंतरही मला संघातून का वगळले?'
चेन्नई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही मला चॅपियन्स करंडक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघातून का वगळण्यात आले, अशी विचारणा हॉकीपटू गुरजन्त सिंग याने केली आहे. याबरोबरच त्याने मी लवकरच संघात परत येईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
स्ट्रायकर म्हणून ओळख असलेल्या गुरजन्त सिंग याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. तरीही त्याला संघाबाहेर जावे लागल्याने त्याने संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहे.

गुरजन्त सिंग म्हणाला, की राष्ट्रकुल स्पर्धेनंतर मला का वागळले हे अद्याप कळाले नाही. मला मान्य आहे की माझ्या चुका झाल्या होत्या, पण संघातून वगळण्याइतपत माझी कामगिरी वाईट झाली नव्हती. चॅपियन्स करंडकात रोटेशन पॉलिसीनुसार मला वगळले असे मला वाटले होते, पण आशियाई स्पर्धेतही मला संघाबाहेर ठेवण्यात आले. मी अजूनही संघातील महत्त्वाचा सदस्य असल्याने मला आशा आहे भविष्यात संघात स्थान मिळेल.