World Cup 2019 : फायनल पाकिस्तानशी असेल तरी खेळू नका : गंभीर

वृत्तसंस्था
Monday, 18 March 2019

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : अटी शर्तीवर पाकिस्तानशी खेळण्याचे संबंध ठेऊ नका, केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांत खेळायचे आणि द्विपक्षीय मालिकांवर बंदी घालायची अशी धोरणे ठेऊ नका, पाकिस्तानबरोबर सर्वच प्रकारचे क्रिकेट संबंध संपवून टाका असे खरमरीत मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि नुकताच पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : अटी शर्तीवर पाकिस्तानशी खेळण्याचे संबंध ठेऊ नका, केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांत खेळायचे आणि द्विपक्षीय मालिकांवर बंदी घालायची अशी धोरणे ठेऊ नका, पाकिस्तानबरोबर सर्वच प्रकारचे क्रिकेट संबंध संपवून टाका असे खरमरीत मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि नुकताच पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. 

पाकिस्तानविरुद्ध नेहमीच तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या गंभीरने पुलवामा हल्यानंतर अधिकच संताप व्यक्त केलेला आहे. अटी-शर्थींची बंदी असून शकत नाही. एकतर तर तुम्ही पूर्णतः खेळू नका नाही तर सर्व सामन्यांत खेळा. पुलावामा हल्ला संताप आणणारा आहे, अशी जहरी टीका गंभीरने एका व्यावसाईक कार्यक्रमानंतर बोलताना सांगितले. 

आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे जाणार नाही, पण आशिया करंडकसारख्या स्पर्धांमध्ये आपण पाकिस्तानशी न खेळण्याची भूमिका घेऊ शकतो, असे सांगताना गंभीरने 2003 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत झिम्बाब्वेतील रॉबर्ट मुगाबेत्या राजवटीला विरोध करण्यासाठी इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्धचा साखळी सामना न खेळण्याची आठवण सांगितली.

बीसीसीआयनेही येत्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर प्रत्येक जण त्यासाठी मानसिककृष्ट्या तयार होत आहे. आपण दोन गुण गमावले तर उपांत्य फेरीस पात्र ठरण्यावर त्याचा परिणाम होईल, असाही एक मतप्रवाह आहे, पण पाकिस्तानवर बंदी घातल्यानंतर आपल्या पुढे चाल करता आली नाही तर कोणाला त्याचे दुःख वाटणार नाही, असेही गंभीरने नमुद केले. 

फायनलही सोडून द्यावी 
विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर पाकिस्तानशी सामना झाला तर काय करायचे, या प्रश्‍नावर गंभीरने अंतिम सामनाही सोडून द्यायचा, 40 जवानांचे गेलेले जीव महत्वाचे आहेत दोन गुण महत्वाचे नाही. अंतिम सामना सोडून द्यायचा निर्णय घेतला तर देशही पाठीशी असेल, असे स्पष्ट मत गंभीने व्यक्त केले. 

पुलवामा हल्यानंतर भारतात झालेल्या ऑलिंपिक खेळांच्या काही स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याचा परिणाम अशा स्पर्धांवर झाला आहे. भारतात पुढे होणाऱ्या स्पर्धांच्या नियोजनाबाबतही प्रश्‍नचिन्ह उभे केले जात आहे. भारतात होणाऱ्या अशा स्पर्धांसाठी सर्व देशांना व्हिसा देण्यात भारतीय ऑलिंपिक असोशिएनने सहकार्य करावे असे ऑलिंपिक समितीने सांगितलेले आहे. या संदर्भात विचारले असता गंभीरने जागतिक क्रीडा क्षेत्राच्या बंदीपेक्षा जवानांचे जीव महत्वाचे असल्याचा पुनरुच्चार केला. 

जवानांचा जीव महत्वाचा की खेळ हे अगोदर ठरवायला हवे, पाकिस्ताशी सर्व खेळांमधले संबंध तोडावे आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांकडून आपल्यावर कारवाई झली तरी बेहत्तर खेळ, कला, संस्कृती यापेक्षा देशभावना महत्वाची आहे. 
-गौतम गंभीर 

संबंधित बातम्या