World Cup 2019 : भारताला मोठा धक्का; महंमद शमी 'वर्ल्ड कप'मधून बाहेर राहणार?

वृत्तसंस्था
Thursday, 14 March 2019

भारताचा प्रमुख गोलंदाज महंमद शमीला आता कुठे सूर गवसला असताना त्याच्या विश्वकरंडकातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शमीवर हुंड्यासाठी छळ आणि शारीरिक छळ केल्याबद्दल त्याच्यावर IPC 498A आणि  354A या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : भारताचा प्रमुख गोलंदाज महंमद शमीला आता कुठे सूर गवसला असताना त्याच्या विश्वकरंडकातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शमीवर हुंड्यासाठी छळ आणि शारीरिक छळ केल्याबद्दल त्याच्यावर IPC 498A आणि  354A या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्याची पत्नी हसिन जहाँने त्याच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर कोलकाता पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे त्याचा विश्वकरंडकातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

त्याच्या पत्नीने यापूर्वी त्याच्यावर विवाहबाह्य संबंध, मॅट फिक्सिंग, देशद्रोह असे अनेक आरोप केले आहेत. या आरोपांनंतर कोलकता पोलिसांनी त्याची चौकशीही केली होती. त्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरु आहे. 

त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रांवर 22 जूनला सुनावणी होणार आहे. विश्वकरंडक स्पर्धा 30मे ते 14 जूलै या कालावधीत होणार असल्याने त्याच्या सहभागाबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. 

संबंधित बातम्या