लिटन दासच्या शतकानंतरही बांगलादेशचा डाव गडगडला 

सुनंदन लेले 
Friday, 28 September 2018

दुबई : 120 धावांची जबरदस्त सलामी मिळूनही बांगलादेशाचे सर्व फलंदाज 222 धावांमध्ये बाद झाले. दोन जीवदानांचा फायदा घेत सलामीवीर लिटन दासने झळकावलेल्या शानदार शतकामुळे बांगलादेश संघाला आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी निर्माण झाली होती. भारतीय गोलंदाजांनी श्रम करून बांगलादेशाची धावसंख्या रोखली. दुबई स्टेडियमच्या टणक खेळपट्टीवर विजयाकरता 223 धावांचा पाठलाग करणे भारतीय फलंदाजांच्या आवाक्याच्या बाहेर नक्कीच नाही.

नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करायचा घेतलेला निर्णय बर्‍याच जाणकारांना चकित करून गेला. भारताने सलामीचे नेहमीचे फलंदाज सलामीचे नेहमीचे गोलंदाज आणि चहलला संघात परत जागा दिली. बांगलादेश संघ व्यवस्थापनाने लिटन दास सोबत शांत डोक्याने खेळणार्‍या मेहदी हसनला सलामीला पाठवून चांगली चाल रचली. खेळाच्या एकदम सुरुवातीला लिटन दासचा कठीण झेल दिनेश कार्तिकला पकडता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि बुमराची गोलंदाजी खूप परिणाम साधू शकली नाही. तसेच फिरकी गोलंदाजांनी प्रभावी मारा केला नाही. लिटन दासने 34 चेंडूत अर्धशतक ठोकले. मेहदी हसन हुशारीने फक्त एकेरी धाव काढून दासला खेळायची संधी देत राहिला. अखेर केदार जाधवने संघाला 120 धावांच्या सलामीनंतर पहिले यश मिळवून दिले. 

दासचा अजून एक सोपा झेल युझवेंद्र चहलने सोडला. अगोदरच्या बर्‍याच सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या लिंटन दासने बरोबर अंतिम सामन्यात मोठी खेळी केली. 87 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह लिटन दासने शतक पूर्ण केले. केदार जाधवने मुश्फीकूरला बाद करून कमाल केली. समंजस फलंदाज मेहमदुल्ला हवेतून फटका मारताना कुलदीपला बाद झाला तिथेच बांगलादेशच्या धावसंख्येतली गती मंदावली. 20 ते 40 षटकात 62 धावा निघाल्या.  

शेवटच्या 10 षटकांचा खेळ चालू झाल्यावर लिटन दासने गियर बदलला. 121 धावांची चांगली खेळी करून दास कुलदीपला बाद झाला ते धोनीने केलेल्या चपळ स्टपिंगमुळे.  तळात सौम्य सरकारने 33  धावा केल्यावर बांगलादेशचा डाव 222 धावांवर आटोपला. कुलदीप यादवने 3 आणि केदार जाधवने 2 फलंदाजांना बाद केले. 

संबंधित बातम्या