World Cup 2019 : मायदेशात विश्वकरंडक जिंकण्यासाठी इंग्लंडने निवडले 'हे' खेळाडू

वृत्तसंस्था
Wednesday, 17 April 2019

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला विश्वकरंडाकासाठी संघात संधी दिली जाणार का? याची खूप मोठी चर्चा केली जात होती. अखेर इंग्लंडने आर्चरला संघात स्थान दिले नाही.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : जूनमध्ये घरच्या मैदानावर होणाऱ्या विश्वकरंडकासाठी इंग्लंडने 15 खेळाडूंचा संभाव्य संघ आज जाहीर करण्यात आला. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला विश्वकरंडाकासाठी संघात संधी दिली जाणार का? याची खूप मोठी चर्चा केली जात होती. अखेर इंग्लंडने आर्चरला संघात स्थान दिले नाही. मात्र, त्याला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. 

इंग्लंडने वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेतील संघात कोणताही बदल केले नाही. इयॉन मार्गनकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तसेच संघात करन बंधूपैकी टॉम करनला स्थान मिळाले आहे. 

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठीही इंग्लंडने संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये आर्चर आणि ख्रिस जॉर्डन यांना संधी देण्यात आली आहे. विश्वकरंडकापूर्वी आराम मिळावा म्हणून मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर आणि बेन स्टोक्स यांना या मालिकेतील एका सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघातील जे खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत त्यांना 26 एप्रिलपूर्वी मायदेशी परतण्यास सांगण्यात आले आहे. 

पाकिस्तानविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका झाल्यावर इंग्लंड विश्वकरंडकासाठी अंतिम 15 खेळाडूंचा संघ जाहीर करणार आहे. 

संबंधित बातम्या