World Cup 2019 : 'अ' श्रेणीतील पंतऐवजी  'क' श्रेणीतील कार्तिक

संजय घारपुरे
Monday, 15 April 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या दुसऱ्या यष्टिरक्षकाची निवड करताना निवड समितीस अवघ्या दीड महिन्यापूर्वी घेतलेल्या निर्णयाचा विसर पडला. 

मुंबई : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या दुसऱ्या यष्टिरक्षकाची निवड करताना निवड समितीस अवघ्या दीड महिन्यापूर्वी घेतलेल्या निर्णयाचा विसर पडला. 

निवड समितीने गेल्या महिन्यात (7 मार्च) मध्यरात्री भारतीय क्रिकेटपटूंची श्रेणी जाहीर केली होती. त्यात 'अ' श्रेणीत अकरा खेळाडू निवडले होते. त्यात रिषभ पंतला स्थान होते. आता ही निवड सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी असली तरीही पंतऐवजी कार्तिक ही निवड धक्का देते. 

आश्‍चर्य म्हणजे निवड समितीनेच ही श्रेणी तयार करताना रिषभ पंतला "अ'; तर दिनेश कार्तिकला "क' श्रेणीत स्थान दिले होते. आता तेच निवड समितीचे प्रमुख प्रसाद "पंतची निवड थोडक्‍यात हुकली. ही निवड करताना यष्टिरक्षण महत्त्वाचे ठरले. त्यामुळे आम्ही कार्तिकला पसंती दिली' असे सांगत आहेत. आता दीड महिन्यापूर्वी "क' दर्जाच्या असलेल्या कार्तिकपेक्षा "अ' दर्जाचा असलेला पंत सरस कसा ठरला, हा प्रश्‍नच येतो. 

तरी विश्‍वकरंडकासाठी नाहीत 
'अ' दर्जा : रविचंद्रन अश्‍विन, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत. 
'ब' दर्जा : उमेश यादव 
'क' दर्जा : अंबाती रायुडू, मनिष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद, वृद्धिमान साहा 

करारबद्ध नाही; तर वर्ल्ड कपसाठी 
निवड समितीने संघनिवडीत सर्वाधिक धक्का दिला तो विजय शंकर याच्या निवडीचा. मार्चमध्ये करारबद्ध खेळाडूत स्थानही न दिलेला विजय शंकर याला या संघात स्थान देण्यात आले. विजय शंकर हा मार्चमध्ये जाहीर केलेल्या एकंदर 25 करारबद्ध खेळाडूंतही नव्हता. 

संबंधित बातम्या