Pro Kabaddi : आयपीएलमध्ये पंड्या बंधू तर प्रो कबड्डीत देसाई बंधू

शैलेश नागवेकर
Tuesday, 9 April 2019

प्रो कबड्डीच्या येत्या सातव्या मोसमात दोन योगायोग घडणार आहेत. दीपक हुडा आणि अमीत हुडा हे दोघे भाऊ जयपूर पिंक पँथरधून खेळणार आहेत तसेच महाराष्ट्राचे सिद्धार्थ देसाई आणि सुरज देसाई हे सख्खे भाऊ तेलगू टायटन्समधून खेळणार आहेत.

Pro Kabaddi : कबड्डीच्या महासागरात महाराष्ट्राचा सिद्धार्थ सर्वात महागडा

सुरज हा कालच कोट्यधीश झालेल्या सिद्धार्थचा मोठा भाऊ. सुरजकडे पाहून सिद्धार्थ कबड्डीकडे वळला आणि शिकलाही. पण सिद्धार्थला काल झालेल्या लिलावात १ कोटी ४५ लाखांचा भाव मिळाला तर  सुरजला १० लाख मिळाले. कालच्या पहिल्या लिलावात सुरजसाठी कोणी बोली लावली नाही, परंतु आजच्या अखेरच्या संधीत तेलगूने त्याला पायाभूत किंमतीत घेतले.

संबंधित बातम्या