वडिलांचे कौतुक ऐकताना दीपिकाचे डोळे पाणावले 

शैलेश नागवेकर
Friday, 15 February 2019

बॅडमिंटनमधील भारताचे पहिले सुपरस्टार प्रकाश पदुकोन यांना स्पोर्टस्‌स्टार मासिकेचा जीवगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. गुरुवारी मुंबईत झालेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार सुनील गावसकर यांनी प्रदान केला.

मुंबई : बॅडमिंटनमधील भारताचे पहिले सुपरस्टार प्रकाश पदुकोन यांना स्पोर्टस्‌स्टार मासिकेचा जीवगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. गुरुवारी मुंबईत झालेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार सुनील गावसकर यांनी प्रदान केला. ऑल इंग्लंड बॅटमिंटन स्पर्धा जिंकून भारतात बॅडमिंटन राजमान्यता मिळवून देणाऱ्या पदुकोन यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्यासह खेळलेल्या सर्व खेळाडूंना दिले आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला.

''त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे ड्रॉ जाहीर होताना आम्ही चीन किंवा इंडोनेशियाच्या खेळाडूंशी आपल्याला खेळायचे आहे की नाही हे पहायचो. आत्ता चीन आणि इंडोनेशियाचे खेळाडू भारतीय खेळाडूंचा सामना करावा लागणार की नाही हे पहतात. एवढी प्रगती आत्ताच्या आपल्या खेळाडूंनी केली आहे,'' असे मत पदुकोन यांनी व्यक्त केले.

Image may contain: 1 person

या पुरस्कार सोहळ्यात पदुकोन यांची पत्नी, मुलगी दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंग उपस्थित होते. आपल्या वडिलांचे कौतुक ऐकताना दीपिकाचे डोळे पाणावले होते.  

Image may contain: 3 people, people smiling, suit

संबंधित बातम्या