IPL 2019 : माहीची क्रेझ एवढी की चेन्नईकर धावले चेपॉककडे

वृत्तसंस्था
Monday, 18 March 2019

चेन्नई म्हणजे धोनीचे दुसरे घर आहे. येथील चाहते धोनीचे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळेच धोनी सराव सत्रात सहभागी होणार म्हटल्यावर तब्बल 12 हजार चाहते त्याचा सराव पाहायला मैदानात दाखल झाले.

आयपीएल 2019 : चेन्नई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याचे चाहते यांच्यात एक वेगळेच नाते आहे. धोनीला ते देवासमान मानतात आणि म्हणूनच त्याच्यासाठी सिक्युरिटी तोडून मैदानात धाव घेताना आपण अनेक चाहत्यांना यापूर्वी पाहिलेले आहे. आयपीएलसाठी सुरु असलेल्या सराव सत्रातही असाच किस्सा पाहायला मिळाला. 

आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचा सराव सुरु असताना एका चाहत्याने खेळपट्टीवर धाव घेतली. त्याला पाहून धोनीनेही त्याची फिरकी घेण्याचे ठरवले आणि तोही मैदानात सैरावैरा पळू लागला. चाहत्याला पाहून सर्वप्रथम धोनी चेन्नईचा गोलंदाजीचा प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीच्या  मागे लपला आणि त्यानंतर मैदानावर पळू लागला. 

चेन्नई म्हणजे धोनीचे दुसरे घर आहे. येथील चाहते धोनीचे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळेच धोनी सराव सत्रात सहभागी होणार म्हटल्यावर तब्बल 12 हजार चाहते त्याचा सराव पाहायला मैदानात दाखल झाले. स्पर्धेला सुरवात होण्यापूर्वीच पी. चिदंबरम स्टेडियम धोनी धोनीच्या जयघोषाने दुमदुमून गेले. 

यंदाच्या आयपीएल मोसमातील पहिला सामना चेन्नई आणि बंगळूरच्या संघांमध्ये 23 मार्चला होणार आहे. 

संबंधित बातम्या