मिलानविरुद्धच्या बरोबरीनंतरही बार्सिलोना बाद फेरीत 

वृत्तसंस्था
Wednesday, 7 November 2018

मेस्सीशिवाय खेळताना बार्सिलोना संघाने मिळविलेली एका गोलची आघाडी त्यांना टिकवता आली नाही. थंड डोक्‍याने खेळणाऱ्या मौरो इकार्डीने 87व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर मिलानने सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. सामन्यावर सुरवातीपासून वर्चस्व राखणाऱ्या बार्सिलोनाला राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या माल्कमने आघाडीवर नेले होते. 

मिलान : इंटर मिलानविरुद्ध स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीशिवाय खेळताना विजयाची संधी दवडूनही बार्सिलोना एफसी संघ चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत पोचला. 

मेस्सीशिवाय खेळताना बार्सिलोना संघाने मिळविलेली एका गोलची आघाडी त्यांना टिकवता आली नाही. थंड डोक्‍याने खेळणाऱ्या मौरो इकार्डीने 87व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर मिलानने सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. सामन्यावर सुरवातीपासून वर्चस्व राखणाऱ्या बार्सिलोनाला राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या माल्कमने आघाडीवर नेले होते. 

आम्ही गोल करण्यात नशीबवान ठरलो, हे मिलानच्या इकार्डीने मान्य केले. तो म्हणाला, ""आम्ही एका सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळलो. त्यांनी बार्सिलोनाच्या लौकिकाला साजेसा असाच खेळ आणि गोल केला; पण आम्ही त्यानंतरही त्यांनी फारशी संधी दिली नाही. आम्ही त्यांना झुंजवले. अखेरच्या सत्रात सुदैवाने चेंडू माझ्या पुढ्यात आला आणि मी ती संधी साधली.'' 

मेस्सीशिवाय खेळणाऱ्या बार्सिलोनाला विजय मिळविण्यात अपयश आले. वर्चस्व राखताना त्यांनी गोल करण्याच्या अनेक संधी मिळविल्या, मात्र त्यांना त्या साधण्यात यश आले नाही. त्यांना आघाडी मिळविण्यासाठी सामन्याच्या 83व्या मिनिटाची वाट पाहावी लागली. माल्कमने मिलानच्या दोन खेळाडूंच्या मधून सुरेख किक मारून गोल नोंदविला. त्यानंतर चारच मिनिटांनी इकार्डीने चालून आलेली संधी साधताना मिलानला बरोबरी साधून दिली. 

विजय मिळवू शकलो नाही, याचे वाईट जरूर वाटते. अखेरच्या क्षणी आम्ही गाफिल राहिलो. यानंतरही बाद फेरी गाठण्याच्या आमच्या पहिल्या उद्दिष्टात यशस्वी झालो, याचा आनंद आहे. 
एर्नेस्टो व्हॅव्हेर्डे, बार्सिलोनाचे प्रशिक्षक 

संबंधित बातम्या