Asia Cup 2018 : धोनीची भरमैदानात कुलदीपला धमकी

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

लदीप यादव गोलंदाजी करत असताना धोनीने त्याला गोलंदाजी कर नाहीतर गोलंदाज बदलेन असा इशारा दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दुबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदनावर नेहमीच 'बॉस' असतो आणि यष्टींमागून तो प्रत्येकालाच मार्गदर्शन करत असतो. याचाच प्रत्यय अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात आला. कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना धोनीने त्याला गोलंदाजी कर नाहीतर गोलंदाज बदलेन असा इशारा दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

धोनीची यष्टींमागून येणारी टिप्पणी ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यापासून ते त्यांना ताकीद देण्यापर्यंत त्याच्या सर्व हरकती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. अपगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना त्याने क्षेत्ररचना करण्यात जरा जास्तच वेळ घेतला, यावर वैतागलेल्या धोनीने त्याला ''आता गोलंदाजी करतोस का गोलंदाज बदलू?'' असा इशारा दिला. 

अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने धोनीला पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याने 200व्यांदा एकदिवसीय सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषविले.

संबंधित बातम्या