नवोदित बॉक्‍सर देशाचा विचारही करीत नाहीत: मेरी कोम

वृत्तसंस्था
Wednesday, 5 December 2018

नवोदित बॉक्‍सिंग खेळाडूंची खरे तर मला चिंताच वाटते. त्या सतत दुखापतीने बेजार असतात. कधी नसच आखडते, तर कधी दुखावते. किती प्रकारच्या दुखापती होतात. त्यांच्यापेक्षा या एवढ्या वयात मला कमी दुखापती होतात. 
- मेरी कोम 

मुंबई : महिला बॉक्‍सिंग खेळाडू आता एकमेकींना साह्य करण्यास तयार नसतात. नवोदित बॉक्‍सिंग खेळाडू फक्त स्वतःचाच विचार करतात. देशाचा विचारही करीत नाहीत. हाच विचार असेल, तर परिस्थिती कशी बदलेल, अशी विचारणा मेरी कोमने केली. 

सहा वेळा जगज्जेतेपद जिंकलेल्या मेरी कोमच्या हस्ते मुंबईत "स्टार्स ऑफ टूमारो'अंतर्गत 13 क्रीडापटूंना गौरविण्यात आले. त्यानंतर मेरीने निवडक पत्रकारांबरोबर बोलताना भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंवर ताशेरे ओढले. एक बॉक्‍सर दुसऱ्याला मदत करायला तयार नसतो. जागतिक स्पर्धेसाठी संघ जाहीर झाला आणि काही वेळांतच संघात स्थान न मिळालेल्या बहुतेक मुली निघून गेल्या. आता सराव कोणाबरोबर करणार. ज्या थांबल्या होत्या त्याही नाइलाजास्तवच होत्या. अखेर मी पुरुष बॉक्‍सरबरोबरच स्पर्धेचा सराव केला, असे मेरीने सांगितले. 

आगामी ऑलिंपिकमध्ये काय होईल, याचा मी सध्या फारसा विचार करीत नाही. पण, मला सध्या महिला बॉक्‍सिंग खेळाडूंची एकमेकांना न मिळणारी साथ सलत आहे. काही वर्षांपूर्वी परिस्थिती जरा तरी बरी होती; पण आता सर्वच बदलले आहे. कोणी मदत करायलाच तयार नसते. नवोदित बॉक्‍सरचे तर आपल्याच कामगिरीवर लक्ष असते. देशाचे काय, याकडे त्या लक्षही देत नाहीत. हाच विचार असेल, तर परिस्थिती कशी बदलणार. भविष्यातही फार काही आशा नसतील, असेही मेरीने सांगितले. 

नवोदित बॉक्‍सिंग खेळाडूंची खरे तर मला चिंताच वाटते. त्या सतत दुखापतीने बेजार असतात. कधी नसच आखडते, तर कधी दुखावते. किती प्रकारच्या दुखापती होतात. त्यांच्यापेक्षा या एवढ्या वयात मला कमी दुखापती होतात. 
- मेरी कोम 

संबंधित बातम्या