Asia Cup 2018 : भुवनेश्वरने केले चिमुकल्या भारतीय चाहत्याचे सांत्वन

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

या लहान मुलाचे नाव अर्जन असे असून सामन्यानंतर तो स्टेडियममध्ये रडत होता. त्यांचे वडिल अमरप्रित सिंग यांनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारनेही त्याला फोन करत त्याची समजूत घातली आणि अंतिम सामना जिंकण्याची ग्वाहीही दिली. 

दुबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याचा शेवट अत्यंत रोमांचक झाला आणि हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर अनेक चाहते नाराज झाले होते मात्र, एका लहान मुलाने रडत आपल्या दु:खाला वाट करुन दिली आणि सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. अगदी भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला फोन करुन त्याचे सांत्वन केले. 

अफगाणिस्तानचा सर्वांत अनुभवी फलंदाज राशिद खान शेवटचे षटक टाकायला आला. शेवटच्या दोन चेंडूंमध्ये एकाच धावेची गरज असताना भारताचा अष्टपौली खेळाडू रविंद्र जडेजा फलंदाजी करत होता. मात्र, तो झेलबाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. हा निकाल पाहून या चिमुरड्याला रडू आवरले नाही. 

या लहान मुलाचे नाव अर्जन असे असून सामन्यानंतर तो स्टेडियममध्ये रडत होता. त्यांचे वडिल अमरप्रित सिंग यांनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारनेही त्याला फोन करत त्याची समजूत घातली आणि अंतिम सामना जिंकण्याची ग्वाहीही दिली. 

भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगनेही ट्विट करत त्याला वाईट वाटून न घेण्याचा सल्ला दिला होता. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान आणि सलामीवीर महंमद शहजाद यांनीही त्याच्यासोबत फोटो काढले.

संबंधित बातम्या