ICC Women's World T20 : हरमनप्रित करणार ट्वेंटी20 विश्वकरंडकात संघाचे नेतृत्व

वृत्तसंस्था
Friday, 28 September 2018

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात वेस्टइंडिजमध्ये होणाऱ्या महिला ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठी बीसीसीआयने आज भारतीय महिला संघाची घोषणा केली. भारताची स्फोटक फलंदाज हरमनप्रित कौरकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच गेल्या काही महिन्यात सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाला संघाची उप-कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. 9 ते 24 नोव्हेंबर या दरम्यान विश्वकरंडक स्पर्धा होणार असून, भारताचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

भारतीय संघाचा ब गटात समावेश करण्यात आला असून या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड या संघांचा समावेश आहे.

नोव्हेंबर 11ला भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. तसेच 15 नोव्हेंबरला आयर्लंड विरुद्ध सामना होणार असून 17 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळीतील शेवटचा सामना होईल.

संबंधित बातम्या