Christchurch Mosque Shooting : भयानक गोळीबारातून बांगलादेशचे क्रिकेटपटू बचावले

वृत्तसंस्था
Friday, 15 March 2019

न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदाधूंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघातीन खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. संघातील सर्व खेळाडू मशिदीच्या आत जाणार तेवढ्यात गोळीबाराला सुरवात झाली अशी माहिती बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रवक्ते जलाल युनूस यांनी दिली.

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदाधूंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघातीन खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. संघातील सर्व खेळाडू मशिदीच्या आत जाणार तेवढ्यात गोळीबाराला सुरवात झाली अशी माहिती बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रवक्ते जलाल युनूस यांनी दिली.

''संघातील सर्व खेळाडू सुखरूप आहेत मात्र, त्यांना मोठा धक्का बसला आहे. आम्ही खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला दिला आहे,'' असे मत जलाल यांनी व्यक्त केले. न्यूझीलंड आणि बागंलादेश यांच्यात हेग्ली ओव्हल येथे होणारा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. या गोळीबारात जवळपास 27 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

stuff.co.nz या संकेतस्थळाने एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, आपण प्रार्थना करत असताना गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिले असता आपली पत्नी रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेली होती. दुसऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलांवर गोळीबार होताना पाहिल्याचे सांगितले. माझ्या आजुबाजूला सगळीकडे मृतदेह होते असेही त्यांनी सांगितले.

हल्लेखोराने लष्कर जवानांसारखे कपडे परिधान केले होते अशी माहिती आहे. मात्र अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान गोळीबारानंतर परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या