फुलराणीची फेअरीटेल; साईना नेहवाल आणि पी कश्यप बांधणार लग्नगाठ

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

भारताची फुलराणी साईना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 16 डिसेंबरला कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.

हैदराबाद : भारताची फुलराणी साईना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 16 डिसेंबरला कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जवळच्या 100 लोकांना या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. ''दोन्ही परिवार बऱ्याच पूर्वीपासून या लग्नाची तयारी करत आहेत. आता त्यांनी तारीख निश्चित केली असून 16 डिसेंबरला हा विवाह सोहळा पार पडेल,'' अशी माहिती या जोडप्याच्या कुटुंबियांनी दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday  #fatpigeon #fatturnsone #fatpigeonbarhop #goodvibes

A post shared by Parupalli Kashyap (@parupallikashyap) on

 

साईना आणि पी. कश्यप हे जवळपास दहा वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. ते नेहमी श्रीकांत किदांबी, एच एस प्रणॉय आणि गुरुसाईदत्त यांच्यासह एकत्रपणे फिरत असे. 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या कश्यपने साईनासोबतचे नाते हे फक्त मैत्रीचे असल्याचे वारंवार सांगितले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#throwbackbday

A post shared by Parupalli Kashyap (@parupallikashyap) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@tarunkona wedding tonight ...congratulations to u 

A post shared by SAINA NEHWAL (@nehwalsaina) on

साईना आणि कश्यप यांची भेट 2005मध्ये गोपीचंद यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आल्यावर झाली होती. लंडन 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत यांच्या नात्याबद्दल चर्चा होण्यास सुरवात झाली होती मात्र, यावर्षी गोल्ड कोस्ट स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यावर साईनाने कश्पचे आभार मानत या विजयात त्याचा मोठा वाटा असल्याचे म्हटले होते. यानंतरच त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. 

काही दिवसांपूर्वी साईनाने पी. कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता. साईना आणि पी. कश्यप यांच्या आधी सानिया-शोएब, दीपिका पल्लीकल-दिनेश कार्तिक, इशांत शर्मा-प्रतिमा सिंग, गीता फोगट-पवन कुमार, साक्षी मलिक-सत्यवर्त काडयान हे स्टार खेळाडू विवाहबंधनात अडकले आहेत. 

संबंधित बातम्या