ऑलिंपिक पात्रता प्रक्रियेवर प्रशिक्षक गोपीचंद यांचे स्मॅश 

वृत्तसंस्था
Sunday, 31 March 2019

भारतीयांनी पुढील वर्षाच्या सुरवातीपर्यंत ऑलिंपिक पात्रता निश्‍चित करणे योग्य होईल. हे केल्यासच ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. ही पात्रता लांबल्यास ऑलिंपिक नजीक असताना त्याचे दडपण जास्त येईल. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीस अव्वल 16 मध्ये असल्यास ऑलिंपिक पात्रता निश्‍चित मानता येऊ शकेल. 
- गोपीचंद, भारतीय बॅडमिंटन मार्गदर्शक 

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटनचे भरगच्च कार्यक्रम खेळाडूंना सरावास पुरेसा वेळ देत नाही, या आक्षेपानंतर राष्ट्रीय मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी ऑलिंपिक पात्रता प्रक्रियेवरच टीका केली आहे. या सर्व पात्रता प्रक्रियेचाच जागतिक महासंघाने फेरविचार करावा, असे सुचविले आहे. 

खेळाडूंना बक्षीस रकमेतून चांगले पैसे मिळायला हवेत. त्याचबरोबर प्रतिथयश खेळाडूंचा सहभाग निश्‍चित असेल, तरच पुरस्कर्ते लाभतील, पण त्यामुळे ऑलिंपिक पात्रता एक वर्ष सुरू राहणेही चुकीचे आहे. खरंतर जागतिक, आशियाई, युरोपियन यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतील विजेत्यांना ऑलिंपिकमध्ये थेट प्रवेश हवा. वर्षभर जगभर खेळल्याचा ताण खेळाडूंवर येईल, असे गोपीचंद यांचे म्हणणे आहे. 

जागतिक महासंघाने गतवर्षीपासून जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या 15 खेळाडूंवर जागतिक मालिकेतील 15 पैकी 12 स्पर्धा खेळणे बंधनकारक केले आहे. वाढत्या स्पर्धेतील सहभाग आवश्‍यक असल्याने खेळाडूंची दमछाक होत आहे. गेले पाच आठवडेच बघा, सतत महत्त्वाच्या स्पर्धा होत आहेत. आता या परिस्थितीत खेळाडू दमणारच. जागतिक महासंघाने खेळाचा दर्जा उंचावण्याकडे लक्ष द्यायला हवे, असे गोपीचंद म्हणाले. 

भारतीयांनी पुढील वर्षाच्या सुरवातीपर्यंत ऑलिंपिक पात्रता निश्‍चित करणे योग्य होईल. हे केल्यासच ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. ही पात्रता लांबल्यास ऑलिंपिक नजीक असताना त्याचे दडपण जास्त येईल. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीस अव्वल 16 मध्ये असल्यास ऑलिंपिक पात्रता निश्‍चित मानता येऊ शकेल. 
- गोपीचंद, भारतीय बॅडमिंटन मार्गदर्शक 

संबंधित बातम्या