ऑस्ट्रेलियन ओपननंतर कदाचित कधीच खेळू शकणार नाही..!

वृत्तसंस्था
Friday, 11 January 2019

ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अॅंडी मरे याने आज साश्रूय नयनाने निवृतीवर भाष्य केले. या वर्षी होणाऱ्या विंब्लडन स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचा विचार मरे करत आहे.

मेलबर्न : ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अॅंडी मरे याने आज साश्रूय नयनाने निवृतीवर भाष्य केले. या वर्षी होणाऱ्या विंब्लडन स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचा विचार मरे करत आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून सुरु होणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा कदाचित अखेरची स्पर्धी ठरु शकेल असे सांगताना मात्र त्याला रडू आवरणे कठीण गेले. 

तीनवेळा ग्रॅंडस्लॅम विजेता असलेला मरे कंबरेला झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी झगडत आहे. ''पुढील चार पाच महिनेही या देखण्यासह मी खेळू शकेन असा मला वाटत नाही. मला विबंल्डनपर्यंत खेळण्याची इच्छा आहे. मात्र मी तोपर्यंत खेळू शकेन याबदद्दल मला शंका आहे," भावनाविवश होऊन मरेने आपले मत व्यक्त केले. 

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान त्याच्या कंबेरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याने लंडनच्या क्वीन्स क्लब स्पर्धेतून पुनरागमन केले होते. मात्र पुढे केवळ चार स्पर्धा खेळून त्याने सप्टेंबरमध्ये पुन्हा विश्रांती घेतली. 
 

संबंधित बातम्या