Asia Cup 2018 : भारत- पाक सामन्यासाठी आणखी नऊ महिने थांबा

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

आता भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी थेट जून 2019 मध्ये समोरासमोर येणार आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत 16 जून 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

मुंबई : आशिया करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार या चाहत्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवत बांगलादेशने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे जेतेपदाच्या लढतीत भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व चाहत्यांची निराशा झाली. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे राजकिय संबंध पाहता यांच्यात क्रिकेट मालिका खेळविली जाईल, असे तुर्तास तरी वाटत नाही. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढील सामना पाहण्यासाठी चाहत्यांना नऊ महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

आशिया करंडक स्पर्धेत भारताने साखळी आणि सुपर फोर गटात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ समोरासमोर येतील अशी आशा चाहत्यांना होती. मात्र, बांगलादेशने पाकिस्तानवर 37 धावांनी विजय मिळवला. 

आता भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी थेट जून 2019 मध्ये समोरासमोर येणार आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत 16 जून 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ कोणत्याही स्पर्धेत समोरासमोर येण्याची शक्यता नाही.

संबंधित बातम्या