Asia Cup 2018 : पाकिस्तानला घरचा रस्ता; बांगलादेश फायनलमध्ये

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

संक्षिप्त धावफलक : 
बांगलादेश 48.5 षटकांत सर्व बाद 239 (मुशफिकूर रहिम 99 -116 चेंडू, 9 चौकार, महंमद मिथुन 60 -84 चेंडू, 4 चौकार, जुनैद खान 4-39, शाहिन अफ्रिदी 2-47, हसन अली 2-60) वि. विरुद्ध पाकिस्तान 9 बाद 202 (इमाम 83, मुस्तफिजूर 4-43) 

अबु धाबी : मुशफिकूर रहिमची 99 धावांची खेळी आणि मुस्तफिजूर रेहमानची कमाल गोलंदाजी यामुळे बांगलादेश पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला. बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव केला. आता शुक्रवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया करंडकासाठी लढत होणार आहे.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात बुधवारी बांगलादेशला पाकिस्तानसमोर 240 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानची सलामीची फळी लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर इमाम उल-हक आणि शोएब मलिक यांची प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे फलंदाज बाद जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू न शकल्याने पाकिस्तानला 202 धावांपर्यंत मजल मारता आली. इमामने 83 धावांची खेळी केली. मुस्तफिजूरने चार फलंदाजांना बाद केले. 

त्यापूर्वी, मधल्या फळीत मुशफिकूर रहीम आणि महंमद मिथुन यांनी केलेली भागीदारी त्यांच्या डावाचे वैशिष्ट्य ठरली. बांगलादेशच्या डावाला आकार देणाऱ्या या जोडीतील मुशफिकूर (99) शतकापासून मात्र केवळ एक धाव दूर राहिला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरवात धक्कादायक होती. त्यांचे पहिले तीन फलंदाज 12 धावांत तंबूत परतले होते. त्या वेळी एकत्र आलेल्या मुशफिकूर रहिम आणि महंमद मिथुन यांनी संयमाने फलंदाजी करत बांगलादेशच्या डावाला आकार दिला. अडखळत झालेल्या सुरवातीनंतर बांगलादेशला या जोडीच्या भागीदारीचाच आधार मिळाला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 144 धावा जोडल्या. त्या वेळी मिथुन (60) बाद झाला. एका बाजूने टिच्चून खेळणारा मुशफिकूर शतकासाठी एक धाव असताना बाद झाला. शाहिनने पाकिस्तानला हा ब्रेक थ्रू मिळवून दिला. डावाच्या अखेरच्या टप्प्यात मुशफिकूर बाद झाल्याने बांगलादेशच्या डावाला पुन्हा ब्रेक लागले. या जोडीव्यतिरिक्त बांगलादेशचा केवळ महमुदुल्लाह (25), मश्रफी मुर्तझा (13) यांनाच दोन आकडी मजल मारता आली होती. 

संक्षिप्त धावफलक : 
बांगलादेश 48.5 षटकांत सर्व बाद 239 (मुशफिकूर रहिम 99 -116 चेंडू, 9 चौकार, महंमद मिथुन 60 -84 चेंडू, 4 चौकार, जुनैद खान 4-39, शाहिन अफ्रिदी 2-47, हसन अली 2-60) वि. विरुद्ध पाकिस्तान 9 बाद 202 (इमाम 83, मुस्तफिजूर 4-43) 

संबंधित बातम्या