कोल्हापूरचा 'कॅप्टन' जाणार इंग्लंडला: ब्लॅकबर्न रोव्हर्समध्ये घेणार प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 March 2019

''मी ब्लॅकबर्न रोवर्स फुटबॉल क्लबचा आभारी आहे. त्यांनी माझ्या क्षमतांवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला त्यांच्या जागतिक दर्जाच्या अकादमीत प्रशिक्षणासाठी बोलावले''.

कोल्हापूर : 17 वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संघाचा खेळाडू अनिकेत जाधव ब्लॅकबर्न रोवर्स क्लब येथे फुटबॉल प्रशिक्षणासाठी जाणार आहे.  ब्लॅकबर्न रोवर्स हि चॅम्पियन्स लीग स्पर्धेत विजेता राहिलेल्या संघांपैकी एक आहे. यामध्ये मँचेस्टर युनायटेड, चेल्सी, आर्सेनल, मँचेस्टर सिटी आणि लीचेस्टर सिटी या संघांचा समावेश होतो. हा संघ पुण्यातील व्यंकटेश्वरा हॅचरीज या कंपनी सोबत कार्यरत आहे. अनिकेत जाधव हा अश्या प्रकारचे प्रशिक्षण घेणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरणार आहे. तो इंग्लंडमध्ये स्थित ब्रोकहॉल, लंकेशअरयेथे ब्लॅकबर्न रोवर्स अकादमी येथे प्रशिक्षण घेणार आहे. 

ब्लॅकबर्न रोवर्स फुटबॉल क्लबचे बालाजी राव यांनी सांगितले की, 'आम्ही फुटबॉल समर्थक आहोत,  भारतातील तरुण खेळाडूंच्या गुणवत्तेला आम्ही मदत करू पाहतो'. 'युके मधील आमची ब्लॅकबर्न रोवर्स अकादमी ही कॅटीगिरी 1 मध्ये असलेली अव्वल अकादमी आहे. येथील प्रशिक्षण अनिकेतला नक्कीच तांत्रिक दृष्टीने मदतीचे ठरणार आहे. 

जमशेदपूर फुटबॉल क्लब कडून इंडियन सुपर लीग स्पर्धेत खेळणाऱ्या अनिकेत ने सांगितले की ''मी ब्लॅकबर्न रोवर्स फुटबॉल क्लबचा आभारी आहे. त्यांनी माझ्या क्षमतांवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला त्यांच्या जागतिक दर्जाच्या अकादमीत प्रशिक्षणासाठी बोलावले''.

संबंधित बातम्या