INDvsAUS : राहुल द्रविडने रहाणेला सामन्यापूर्वी दिले खास गिफ्ट

वृत्तसंस्था
Thursday, 6 December 2018

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला एक खास संदेश दिला होता. 

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला एक खास संदेश दिला होता. 

पहिल्या कसोटी सामन्यात रहाणे अवघ्या 13 धावांवर बाद झाला असला तरी आजचा सामना त्याच्यासाठी प्रचंड खास होता आणि त्याला कारणही तसेच खास होते. द्रविडने रहाणेच्या बॅटवर स्वत:च्या हाताने संदेश लिहून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. द्रविडने रहाणेच्या बॅटवर स्वत:च्या स्वाक्षरीसह 'Best Wishes' असा संदेश दिला होता. द्रविडच्या या खास संदेशाचा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.  

अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर भारताचे सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीने भारताने 250 धावांचा टप्पा गाठला. 

संबंधित बातम्या