INDvsWI : रहाणे करतोय फलंदाजीचा कसून सराव

वृत्तसंस्था
Monday, 1 October 2018

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला चार ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे. त्यासाठीच भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे कसून सराव करताना दिसत आहे.   

मुंबई : आशिया करंडकाचे विजेतेपद पटकावल्यावर भारतीय संघ आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर असून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला चार ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे. त्यासाठीच भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे कसून सराव करताना दिसत आहे.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Getting ready for the upcoming series with a nice batting session in the nets.

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

 

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघातील मधल्या फळीतील सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारतीय फलंदाजीवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती. त्यातून धडा घेत भारतीय फलंदाजांना वेस्ट इंडीजविरुद्ध कामगिरी सुधारण्याची संधी आहे. मधल्या फळीत रहाणे प्रमुख खेळाडू असून त्याच्याकडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार यात काहीच शंका नाही. त्यामुळेच रहाणेने फलंदाजीचा कसून सराव करण्यास सुरवात केली असून त्याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. 
 

संबंधित बातम्या