धावपटू रायन हॉलबरोबर मुंबईकर धावले

इतर स्पोर्ट्स
मुंबई : बजाज अलायंझ पुणे अर्धमॅरेथॉनच्या प्रोमो रनला आज मुंबईत उत्साही प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय धावपटू रायन हॉल...

क्रिकेट

बिस्कीट, लॉलिपॉपनंतर आता पाकिस्तानची ट्रॉफी पुन्हा ट्रोल

दुबई : पाकिस्तान संघ सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. मात्र त्यांच्या कामगिरीपेक्षा त्यांनी मालिकेसाठी तयार केलेल्या करंडकांचीच सर्वाधिक चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये बिस्किट आणि लॉलीपॉप आकाराच्या करंडकांमुळे पाकिस्तानचा संघ चांगलाच ट्रोल झाला होता. आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या करंडकावरुनही पाकिस्तानच्या संघाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयार...

टेनिस

दोन वर्षांनंतर जोकोविच अव्वल स्थानी

पॅरिस : सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने तब्बल दोन वर्षांनंतर जबरदस्त पुनरागमन करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. पाच महिन्यांपूर्वी त्याची जागतिक क्रमवारीत 12 वर्षांतील सर्वात नीचांकी स्थानावर घसरण झाली होती. मात्र यंदाच्या वर्षात 14 विजेतेपदं पटकावत त्याने अवव्ल स्थानावर झेप मारली.   जानेवारीमध्ये त्याच्या कोपऱ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याची जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर घसरण झाली होती. मात्र साऱ्या अडचणींवर मात करत त्याने कारकिर्दीतील चौथे विंबल्डन विजेतेपद पटकाविले तर...

फुटबॉल

ऑलिंपिक पात्रता फेरीतील कामगिरी प्रभावी : मेमोल 

यांगॉन (म्यानमार) : भारतीय महिला फुटबॉल संघाने 2020 ऑलिंपिक पात्रता फेरीचा पहिला अडथळा पार करून अंतिम गटात स्थान मिळविले. पहिल्या फेरीचा अडथळा दूर करून अंतिम गटात स्थान मिळविणे, ही खूप मोठी गोष्ट असून, पहिल्या फेरीतील महिलांची कामगिरी नक्कीच प्रभावी करणारी होती, असे संघाच्या प्रशिक्षक मेमोल रॉकी यांनी सांगितले.  पहिल्या टप्प्यातील अखेरच्या फेरीत भारतीय महिलांना म्यानमारविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यानंतरही त्यांनी पात्रतेच्या अंतिम गटात स्थान मिळविले. या कामगिरीवर समाधानी असणाऱ्या प्रशिक्षक मेमोल रॉकी...

बॅडमिंटन

लक्ष्य सेनची  उपांत्यपूर्व फेरीत धडक 

मार्कहॅम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.  लक्ष्यने तैवानच्या चेन शिआऊ चेंग याचा 15-21, 21-17, 21-14 असा पराभव केला. लक्ष्यने याच वर्षी कुमार गटाच्या आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. लक्ष्यची गाठ आता मलेशियाच्या एदिल शोलेह अली सदिकीन याच्याशी पडेल. हा अडथळा पार केल्यास त्याचे जागतिक स्पर्धेतील पदक निश्‍चित होईल.  लक्ष्यप्रमाणेच विष्णूवर्धन गौड पंजला-श्रीकृष्ण साई कुमार पोडिले या जोडीनेही...

लोकल स्पोर्ट्स

महाराष्ट्राच्या पाच बाद 242 धावा

पुणे : सोळा वर्षांखालील गटाच्या विजय मर्चंट करंडक साखळी क्रिकेट स्पर्धेत सचिन धस आणि प्रद्युम्न चव्हाणने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या दिवसअखेर पाच बाद 242 धावा केल्या आहेत.  पूना क्‍लबच्या मैदानावर सोमवारपासून सुरू झालेल्या या तीन दिवसांच्या लढतीत महाराष्ट्राचा कर्णधार कौशल तांबेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यांची सुरवात निराशाजनक ठरली. सोहम शिंदेला दिव्यांशुसिंगने बाद करून महाराष्ट्राची एक बाद 11 अशी अवस्था केली....

इतर स्पोर्ट्स

धावपटू रायन हॉलबरोबर मुंबईकर धावले

मुंबई : बजाज अलायंझ पुणे अर्धमॅरेथॉनच्या प्रोमो रनला आज मुंबईत उत्साही प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय धावपटू रायन हॉल याच्या सहभागामुळे, तर ऍथलीटमध्ये आणखीनच उत्साह संचारला. व्यायामपटूंनी रायनबरोबर तीन-चार किलोमीटर धावून आनंद लुटला. शनिवारी पहाटे मरिन ड्राइव्हच्या विस्तीर्ण प्रोमनेडवर ही प्रोमो रन झाली. मरिन ड्राइव्ह जेथून सुरू होतो, त्या एनसीपीएच्या टोकाला आज पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच हौशी धावपटू जमा झाले होते. सर्वांनी या अर्धमॅरेथॉनचे टी-शर्ट घालून वॉर्मअप आणि आपला अन्य व्यायाम करण्यासही सुरवात केली....